
बाभुळगाव वार्ता प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांचे बाभुळगाव बस स्थानकावर आगमन होताच त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी त्यांनी शहीद प्रकाश विहीरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यानंतर त्यांनी बाभुळगाव नगरपंचायतीमध्ये येऊन नागरिकांशी हितगुज केली व येथेही निवेदने स्वीकारण्यात आली तत्पूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपजिल्हाप्रमुख सचिन महल्ले, नगराध्यक्ष संगीता मालखुरे, उपाध्यक्ष श्याम जगताप, मुख्याधिकारी पल्लवी सोटे, नइम खान, शब्बीर खान, जाकीर खान, मदिना परवीन, शबाना परवीन, मंजुश्री नांदुरकर, प्रदीप नांदुरकर, अक्षय राऊत, अंकुश सोयाम प्रामुख्याने हजर होते. अधिकाऱ्यांशी संवाद साधत ना. राठोड यांनी आजची बैठक रद्द केल्याचे जाहीर करून येत्या दोन आठवड्या नंतर तालुकास्तरीय आढावा बैठक घेण्याचे जाहीर केले. याप्रसंगी नगरपंचायतीतर्फे त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. सावंगी मांगी येथील बेंबळा नदीवर पूल बांधण्या करिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, तालुक्यातील 24 गावे बेंबळा प्रकल्पाच्या पाण्या खाली गेल्यामुळे तालुक्याचे ठिकाण असलेल्या बाभुळगाव येथील व्यापार थंडावला आहे. बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल कशी वाढेल त्या दृष्टीने प्रयत्न व्हावे, मजुरांना मजुरी नाही यामुळे बरेचसे कुटुंब इतरत्र स्थलांतरित होत आहे हा लोंढा कसा थांबवता येईल त्या दृष्टीने प्रयत्न केले जावे, येथे एस टी डेपो, एम आय डी सी व क्रीडा संकुल व्हावे आदि मागण्यांचे निवेदन तालुका प्रेस क्लबच्या वतीने पालकमंत्री ना. संजय राठोड त्यांना देण्यात आले निवेदन देताना प्रेस क्लबचे अध्यक्ष आरिफ अली, कार्याध्यक्ष राजू नवाडे, सचिव विक्रम बऱ्हाणपूरे, शहजाद शेख, प्रवीण लांजेवार, अंकुश सोयाम, अक्षय राऊत, सागर परडखे, रवींद्र काळे, समीर शिंदे, नइमुल्ला, राजू फसाटे, गौरव तातेड, मोहम्मद दानिश शेख प्रामुख्याने हजर होते.