बाभुळगाव जि.प.शाळेत वक्तृत्व व वेशभूषा स्पर्धा संपन्न. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन. बाभुळगांव प्रतिनिधी :- स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी शाळेमध्ये दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.तसेंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शाळेमध्ये वकृत्व स्पर्धा व माँ जिजाऊ यांची वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश सोयाम, प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष लताताई सौसाकडे सदस्य प्रवीण चेंडाकपुरे,शशिकांत थोटे,मुख्याध्यापक सौ विद्या काशेट्टीवार,हेमंत बोरकर,महेश सौदागर, विलास भोयर, देशमुख काका सौदागर बाई आदी मान्यवर मंचकावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण सर्वच थोर महापुरुष यांची जयंती पुण्यतिथी तचेच वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळतो व त्यांच्यातील वक्तृत्व, कला,आत्मविश्वास चालना मिळण्यासाठी असे कार्यक्रम घेणे आवश्यक असल्याचे मत शाळेचे उपक्रमशील शिक्षक राजेश गोसावी यांनी आपल्या प्रस्ताविकातून मांडले .वक्तृत्व स्पर्धेमध्ये नर्सरी, kg1,kg2,व वर्ग 1 ते वर्ग 8 चे विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवून अतिशय रुबाबदार व उत्कृष्ट असे वक्तृत्व पर भाषणे सादर करत बऱ्याच मुलांनी आपल्या भाषणा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन पाटावर विस्तारित अशी भाषणे केली तर बहुतांश मुलींनी माँ जिजाऊची जबरदस्त अशी वेशभूषा परिधान केली होती. सदर दोन्ही स्पर्धेमध्ये परीक्षकांनी उत्तम परीक्षण करून त्यामधे गुणांकन करण्यात आले. दोन्ही स्पर्धेमध्ये गुणानुक्रमे येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक काशेट्टीवार मॅडम यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाम लोखंडे यांनी केले कार्यक्रमाला शिक्षक प्रशांत भुराने,संतोष लिचडे,सुनीता जयसिंगपूरे,ममता बिन्नोड,अश्विनी बोरकर,प्रगती चिंचे,संध्या लांडे,मीनाक्षी इंगोले,श्रद्धा येवतिकर,प्रीती चव्हाण, जांभुरे बाई व विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.