
बाभुळगाव वार्ता / प्रतिनिधी
सावर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत हस्तकला व विज्ञान प्रदर्शन पार पडले. उद्घाटन हाजी मौलवी दानिश व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष नगमा अलीम खान यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक कौशल्यास वाव मिळावा याकरिता या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी गणेश मैघने यांनी सांगितले. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी ग्लोबल वॉर्मिंग, शेती जीवन, सौर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक वस्तू, आदी प्रयोग सादर केले. यशस्वीतेकरिता शाळा समितीच्या अध्यक्ष नगमा अलीम खान, उपाध्यक्ष सरफराज पठाण, मुख्याध्यापक शफीयोद्दीन शेख, शिक्षक अतहर अली, मोहम्मद अकरम, मोहम्मद आसिफ, शिक्षिका शहनाज बानो, कमरुननिसा अली, जिनत अमीन शाह, आदींनी पुढाकार घेतला.