बाभूळगाव नगर पंचायतची निवडणूक अविरोध
तालुका प्रतिनिधी
बाभूळगाव : नगर पंचायत विषय समितीची निवडणूक २६ फेब्रुवारी रोजी नगर पंचायत सभागृहात पार पडली. विषय समितीच्या निवडणूकीत पुन्हा एकदा शिवसेना- काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले आहे. शिवसेच्या मदिना परविन शब्बीर खान यांची बांधकाम सभापतीपदी तर पाणी पुरवठा सभापतीपदी उपाध्यक्ष श्याम जगताप, आरोग्य सभापतीपदी शेख कादर (काँग्रेस), शिक्षण सभापतीपदी शबाना परविन नईम खान (शिवसेना), महिला व बालकल्याण सभापतीपदी मंजुश्री नंदुरकर (काँग्रेस), तर राष्ट्रवादीच्या मंदाकिनी रमेश मोते यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.चार वर्षापूर्वी शिवसेना व काँग्रेस पक्षाने एकत्रित येवून महाविकास आघाडी स्थापन केली होती. शिवसेनेकडे नगराध्यक्षपद तर काँग्रेस कडे उपनगराध्यक्षपद तसेच समितीचे दोन सभापती सेनेकडे तर दोन सभापतीपद काँग्रेसकडे असा सत्तेचा फॉम्यूला त्यावेळेस ठरला होता. त्यानुसार शेवटच्या वर्षीसुद्धा ही महाविकास आघाडी बाभूळगाव शहरात अभेद्य राहीली. आता पाचव्या वर्षीसुद्धा या दोन्ही पक्षाने आपले निर्वीवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. पिठासीन अधिकारी म्हणून यवतमाळ उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी काम पाहिले. तर यावेळी मुख्याधिकारी डॉ. पल्लवी सोटे, कर निरीक्षक पवन जतकर यांनी सहकार्य केले. यानंतर नवनियुक्त विषय समितीच्या सर्व सभापतीचे नगराध्यक्षा संगिता मालखुरे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे गटनेते जाकीर खान, नगरसेवक अमर सिरसाट, कॉंग्रेसचे नगरसेवक अक्षय राऊत, लता उत्तम मनवर, रेणूका अंकुश सोयाम, राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक शेख अहेमद, तालुकाध्यक्ष रमेश मोते, शिवसेना अल्पसंख्याक यवतमाळ जिल्हा प्रमुख शब्बीर खान, शिवसेना शहर प्रमुख नईम खान, शिवसेना महिला शहरप्रमुख साधना सहारे यांचेसह प्रदिप नंदुरकर, अंकुश सोयाम, तृप्ती गुंडारे, मनिषा सोयाम, सुनंदा साठवणे, रजनी भागवत, सविता शिंदे, सारिका वाघाडे, मिरा मालखुरे आदी उपस्थित होते.
