
तहसीलदारांना निवेदन
📍बाभुळगाव वार्ता प्रतिनिधी
राशनकार्ड संबंधित कामांसाठी पुरवठा विभाग तसेच सेतू सुविधा केंद्रांमध्ये शासनाने निश्चित केलेले अधिकृत दरफलक तातडीने लावावेत, अशी मागणी भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव गर्जे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनीबाभूळगाव येथील तहसीलदारांना निवेदन दिले. नवीन राशनकार्ड काढणे, दुरुस्ती करणे किंवा नाव बदलणे अशा कामांसाठी किती शुल्क आकारले जाते याची स्पष्ट माहिती अनेक नागरिकांना नसते. काही सेतू सुविधा केंद्रांमध्ये शासनाने ठरविलेल्या दरांपेक्षा अधिक पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत.